Dolly Chaiwala : डॉली चायवाल्‍यानं मालदिवच्या समुद्र किनाऱ्यावर थाटली टपरी; विदेशींना पाजला चहा…

Dolly Chaiwala
Dolly Chaiwala

पुढारी ऑनलाईन : सोशल मीडियावर जगप्रसिद्ध असलेला डॉली चहावाल्‍याला आज कोण ओळखत नाही. रोज त्‍याचा कोणता ना कोणाता तरी व्हिडिओ व्हायरल होतचं असतो. त्‍याच्या चहा बनवण्याच्या जगावेगळ्या प्रकारामुळे तो चांगलाच चर्चेत आला. आता तर लग्‍जरी कारमधून फिरताना, परदेशात मजेत फिरणारा डॉली चायवाल्‍याचे व्हिडिओही येत असतात. असं जरी असलं तरी तो ज्‍या गोष्‍टीमुळे वर्ल्ड फेमस झाला ती जावापाड चहाची टपरी मात्र ताे सोडत नाही. तस पाहता नागपुरात त्‍याची चहाची टपरी आहे. तेथुनच तो फेमस झाला. मात्र आता त्‍याने त्‍याची चहाची टपरी लावलीय ते ही चक्‍क मालदीवच्या रूपेरी समुद्रकिनाऱ्यावर…

डॉली ने समुद्र किनाऱ्यावर लावली चहा…ची टपरी…

डॉली हा त्‍याच्या अनोख्या चहा बनवण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. आता तर तो चक्‍क मालदीवच्या समुद्र किनारी पोहोचला आहे. अन् त्‍याने मालदीवच्या समुद्र किणाऱ्यावरच आपली देशी टपरी थाटली आहे. डोळ्यावर गॉगल, स्‍टायलीश हेअरस्‍टाईल अन् आपल्‍या हटके अंदाजात तो टपरीवर चहा बनवत आहे. तर पाठीमागे सुंदर निळाशार समुद्र दिसून येत आहे, आणि नेहमीप्रमाणे त्‍याच्या भोवती लोकांचा गराडा पडला आहे. हा आता हा गराडा देशी नाही तर परदेशी नागरिक जे मालदीवला फिरायला आले आहेत त्‍यांचा आहे. परदेशी नागरिक तर डॉलीचा हा चहा बनवण्याचा प्रकार आपल्‍या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत. मग डॉलीही मोठ्या थाटात आणि तितक्‍याच आदराने परदेशी पर्यटकांना आपल्‍या हाताने बनवलेला चहा दिला. डॉलीच्या या करामतींवर फिदा पर्यटकांनी मग त्‍याच्यासोबत फोटोही काढले.

डॉलीच्या व्हिडिओवर चाहत्‍यांच्या कमेंट्स

या व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. डॉलीने @dolly_ki_tapri_nagpur या इंस्‍टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर केला आहे. डॉलीच्या व्हिडिओसोबतच त्‍याच्या चाहत्‍यांनी त्‍याच्या व्हिडिओवर केलेल्‍या कमेंट्सही तितक्‍याच गमतीदार आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news