

पुढारी ऑनलाईन डेस्क: G7 शिखर परिषदेदरम्यान इटली दाैर्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांची भेट झाली होती. या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर केरळ काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या प्रसंगाची खिल्ली उडवली होती. मात्र आता काँग्रेस पक्षाने ही पोस्ट हटवत ख्रिश्चन समुदायाची (Kerala Congress) माफी मागितली आहे, असे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे.
काँग्रेस पक्षाच्या केरळ युनिटने सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्या इटलीतील G7 शिखर परिषदेत झालेल्या भेटीची खिल्ली उडवलेल्या व्यंग्यात्मक पोस्टमुळे भाजपमध्ये नाराजी पसरली होती. काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि पोप या दोघांचाही अपमान केल्याचा आरोप करत या पोस्टचा तीव्र निषेध करत भाजपने (Kerala Congress) आक्रमक पवित्रा घेतला होता.
काँग्रेसकडून हटवण्यात आलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पोप यांच्या सोबतचा फोटो आणि "शेवटी पोपला देवाला भेटण्याची संधी मिळाली!" अशी टिप्पणी होती. यामध्ये पंतप्रधान मोदींच्या मागील विधानाचा संदर्भ होता की, त्यांना विशिष्ट उद्देशासाठी "देवाने पाठवले आहेत". या पोस्टचा तीव्र निषेध करत भाजपने (Kerala Congress) आक्रमक पवित्रा घेतला होता. यानंतर आता काँग्रेस पक्षाने ही पोस्ट हटवत ख्रिश्चन समुदायाची (Kerala Congress) माफी मागितली आहे.