उत्तराखंडमध्ये नदीत बस कोसळून 14 ठार | पुढारी

उत्तराखंडमध्ये नदीत बस कोसळून 14 ठार

रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाचा ताबा सुटल्याने बस अलकनंदा नदीत कोसळली. या अपघातात 14 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर 9 जण जखमी झाले. सर्वजण बद्रीनाथ दर्शनासाठी जात होते. हे पर्यटक दिल्लीतील असल्याचे सांगण्यात येते. गंभीर जखमींना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने हृषीकेश एम्समध्ये दाखल करण्यात आले. अपघात झाला तिथे रेल्वे प्रकल्पाचेही काम सुरू आहे. लोकांना वाचवण्यासाठी म्हणून 3 मजुरांनी नदीत उड्या घेतल्या.

प्रवासी बस-ट्रकची भरतपूर येथे धडक

भरतपूर : राजस्थानातील भरतपुरात शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात प्रवासी बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून, 6 प्रवासी जखमी झाले आहेत. बस भरतपूरहून जयपूरकडे येत होती. विरुद्ध दिशेने येणार्‍या ट्रकने बसला धडक दिली.

Back to top button