कॅबिनेट सचिव, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर बदलण्याच्या हालचाली सुरू

कॅबिनेट सचिव, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर बदलण्याच्या हालचाली सुरू
Published on
Updated on

[author title="उमेश कुमार" image="http://"][/author]

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर आता वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बदलीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आयएएस पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये गृह, परराष्ट्र व्यवहार सचिवांसह रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नर पदाचाही समावेश आहे.

कॅबिनेट सचिव पदाच्या काही जागा रिक्त झाल्या आहेत. सचिव राजीव गौबा यावर्षी ३० आॅगस्ट रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांच्या जागेवरील नियुक्तीसाठी १९८७ च्या बॅचचे अनेक अधिकारी प्रतीक्षेत आहेत. त्यामध्ये वित्त सचिव टी.वी.एस. सोमनाथन, सचिव एन.एन. सिन्हा, वित्त विभागाशी संबंधित (डीईए) सचिव अजय सेठ, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन, झारखंडचे मुख्य सचिव सुखदेव सिंह आणि बिहारचे मुख्य सचिव आमिर सुभानी यांचा समावेश आहे. कॅबिनेट सचिव पदासाठी गुजरातचे मुख्य सचिव राज कुमार यांचे नाव आघाडीवर आहे.

देशातील सर्वात मोठ्या पदावर असलेले कॅबिनेट सचिव राजीव गौबा १९८२ च्या बॅचमधील झारखंड कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. २०१९ मध्ये कॅबिनेट सचिव पदावर त्यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. आतापर्यंत तीनदा त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला आहे. १९८४ च्या बॅचचे आसाम-मेघालय कॅडरचे आयएएस अधिकारी अजय भल्ला यांची आॅगस्ट २०१९ मध्ये गृह सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ २२ आॅगस्टला संपला. मात्र, २०२० मध्ये सेवानिवृत्त होऊन देखील त्यांचा कार्यकाळ आतापर्यंत चार वेळा वाढविण्यात आला आहे.

विदेश सचिव विनय मोहन क्वात्रा यांचा वाढीव कार्यकाळ आॅक्टोबर २०२४ मध्ये संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांच्या जागेवर राजीव गौबा यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपणार आहे. २०१८ मध्ये त्यांना तीन वर्षांसाठी गव्हर्नर पदावर नेमण्यात आले होते. २०२१ मध्ये त्यांना मुदवाढ देण्यात आली होती. त्यांच्या जागेवर आरबीआयच्या गव्हर्नरपदी वित्त सचिव टी.वी.एस. सोमनाथन यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news