NDA Cabinet : केंद्रीय मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर, कोणाला मिळालं कोणतं खातं

Pm Narendra Modi
Pm Narendra Modi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  लोकसभा निवडणुकीत एनडीएने २९३ जागा जिकंत तिसऱ्यांदा बहुमत मिळवले. त्यानंतर रविवारी (दि.९) नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदी याच्या तिसऱ्या कार्यकाळात राष्ट्रपती भवनाच्या सचिवालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार नितीन गडकरी यांच्याकडे सलग तिसऱ्यांदा रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपने संरक्षण, परराष्ट्र, शिक्षण आणि आरोग्य ही महत्त्वाची मंत्रालयेही स्वत:कडे ठेवली आहेत.

कोणाला कोणते खाते

यामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि वाहतूक मंत्रीपद कायम ठेवण्यात येणार असून अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रालय व सहकार खातं कायम ठेवण्यात आले आहे. तसेच अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा यांना रस्ते विकास राज्यमंत्री पद देण्यात आलं आहे. तसेच आश्विन वैष्णव यांना रेल्वेमंत्रीपद देण्यात आले आहे. राजनाथ सिंह यांना पुन्हा संरक्षणमंत्रीपद देण्यात आले आहे. तसेच एस . जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आले आहे. जे. पी नड्डा याच्याकडे आरोग्य मंत्रालय हे खातं असणार आहे. नितीन कुमार स्वामी याच्याकडे अवजड उद्योग मंत्रालय हे खाते देण्यात आले आहे. रक्षा खडसे यांच्याकडे युवक , कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री खाते असणार आहे मुरलीधर मोहोळ यांच्याकडे हवाई वाहतूक राज्यमंत्री खातं देण्यात आलं आहे. प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आले आहे. रामदास आठवले यांना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातील राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. सावित्री ठाकुर यांना महिला आणि बालविकास मंत्रालयातील राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. अनुप्रिया पटेल यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. भागीरथ चौधरी यांना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.

मंत्रिमंडळात पाच महिलांना स्थान

सलग तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात पाच महिला मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. माजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर पंतप्रधानांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. सीतारामन यांच्याशिवाय माजी राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, उत्तर प्रदेशमधून निवडून आलेल्या अनुप्रिया पटेल आणि कर्नाटकमधून निवडून आलेल्या शोभा करंदलाजे यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या महिला नेत्यांमध्ये 37 वर्षीय रक्षा निखिल खडसे यांच्या नावाचाही समावेश आहे.

केंद्रीय व राज्यमत्रीमंडळाची यादी पुढीलप्रमाणे

केंद्रीय मंत्री आणि खातेवाटप 
1.      राजनाथ सिंह- संरक्षण
2.      अमित शाह – गृह, सहकार
3.      नितीन गडकरी – रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग
4.      जगत प्रकाश नड्डा – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण रसायन आणि खते
5.      शिवराज सिंह चौहान – कृषी व शेतकरी कल्याण, ग्राम विकास
6.      निर्मला सीतारामन – अर्थ व वाणिज्य घडामोडी
7.      एस. जयशंकर – परराष्ट्र व्यवहार
8.      मनोहरलाल खट्टर – उर्जा, शहर विकास
9.      एच. डी. कुमारस्वामी – अवजड उद्योग आणि पोलाद
10.  पियुष गोयल – वाणिज्य आणि उद्योग
11.  धर्मेंद्र प्रधान – शिक्षण
12.  जीतन राम मांझी – सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग
13.  राजीव रंजन उर्फ ललन सिंह – पंचायती राज, मत्स्य व्यवयास, दुग्धविकास, पशूसंंवर्धन
14.  सर्वानंद सोनोवाल – बंदरे, जहाज बांधणी, जलमार्ग
15.  डॉ. वीरेंद्र कुमार – सामाजिक न्याय आणि अधिकारीता
16. के. आर. नायडू – नागरी उड्डयण
17.  प्रल्हाद जोशी – ग्राहक संरक्षण, अन्न न नागरी पुरवठा, नवीनीकरण उर्जा
18.  जुयल ओरवन – आदीवासी विकास
19.  गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग
20.  अश्विनी वैष्णव – माहिती प्रसारण, रेल्वे, माहिती व तंत्रज्ञान
21.  ज्योतिरादित्य शिंदे – संचार, उत्तर पूर्व राज्य विकास
22.  भुपेंद्र यादव – पर्यावरण, वने, वातावरणीय बदल
23.  गजेंद्र सिंह शेखावत – संस्कृती आणि पर्यटन
24.  अन्नपूर्णा देवी – महिला व बालविकास
25.  किरण रिजिजू – संसदीय कामकाज आणि अल्पसंख्यांक विकास
26.  हरदीप सिंह पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु
27.  मनसुख मंडाविया – कामगार आणि रोजगार, क्रिडा व युवक कल्याण
28.  जी. किशन रेड्डी – कोळसा आणि खाण
29.  चिराग पासवान – अन्नप्रक्रिया उद्योग
30.  सी. आर. पाटील – जलशक्ती
केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या खात्यांची यादी
1. जितीन प्रसाद – वाणिज्य व उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान
2. श्रीपाद नाईक – उर्जा, नवीनीकरण उर्जा
3. किशन पाल गुर्जर – सहकार
4. पंकज चौधरी – अर्थ
5. रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि अधिकारिता
6. रामनाथ ठाकूर – कृषी आणि शेतकरी कल्याण
7. नित्यानंद राय – गृह
8. अनुप्रिया पटेल – आरोग्य व कुटुंब कल्याण, रसायन आणि खते
9. व्ही. सोमन्ना –रेल्वे, जलशक्ती
10. चंद्रशेखर पेम्मासानी – ग्रामविकास, संचार
11. एस. पी. सिंग बघेल – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पंचायत राज
12. शोभा करंदलाजे – सूक्ष्म, लघू मध्यम उद्योग, कामगार आणि रोजगार
13. कीर्तीवर्धन सिंग – पर्यावरण, वन आणि हवामान बदल, परराष्ट्र व्यवहार
14. बीएल वर्मा – ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
15. शंतनू ठाकूर – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय
16. सुरेश गोपी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पर्यटन
17. एल. मुरुगन – माहिती प्रसारण आणि संसदीय कामकाज
18. बंदी संजय कुमार – गृह
19. अजय टमटा – रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग
20. भगीरथ चौधरी – कृषी आणि शेतकरी कल्याण
21. कमलेश पासवान – ग्रामविकास
22. सतीशचंद्र दुबे – कोळसा, व खाण
23. संजय सेठ – संरक्षण
24. रवनीत सिंग बिट्टू – अन्न प्रक्रिया उद्योग आणि रेल्वे
25. दुर्गा दास उईके – आदिवासी विकास
26. रक्षा खडसे – क्रिडा आणि युवक कल्याण
27. सुकांता मजुमदार – शिक्षण, ईशान्येकडील राज्यांचा विकास
28. सावित्री ठाकूर – महिला आणि बाल विकास
29. तोखान साहू – गृहनिर्माण आणि शहरी विकास
30. राजभूषण चौधरी – जलशक्ती
31. भूपती राजू श्रीनिवास वर्मा – अवजड उद्योग, पोलाद
32. हर्ष मल्होत्रा – रस्ते वाहतूक आणि महामार्ग, कॉर्पोरेट घडामोडी
33. निमुबेन बांभनिया – ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा
34. मुरलीधर मोहोळ – सहकार, नागरी उड्डयण
35. जॉर्ज कुरियन – अल्पसंख्याक व्यवहार, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय
36. पवित्रा मार्गेरिटा – परराष्ट्र व्यवहार, वस्त्रोद्यो

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news