आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीत खलबते

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीत खलबते

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन करण्याविषयी राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला असतानाच महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी रणनीती आखण्याबाबतही खलबते सुरू आहेत.

शुक्रवारी राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबत विचारमंथन करण्यात आले.
बैठकीत झालेल्या चर्चेबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: प्रसारमाध्यमांना दिली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढविण्याबाबत आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करण्याच्या केलेल्या मागणीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले. बैठकीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे उपस्थित होते. यावेळी रावेरच्या खासदार रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांनीही या नेत्यांची भेट घेतली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news