Maharashtra Politics : थापांचा बाप कोण? चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

थापांचा बाप कोण? चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
Supriya Sule Vs Chitra Wagh
Maharashtra Politics : थापांचा बाप कोण? चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणाSupriya Sule Vs Chitra Wagh
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लवकरच संसदेत पाऊल ठेवाल तेव्हा या महापुरूषांसमोर नतमस्तक होऊन खोटं बोलल्याचं प्रायश्चित्त घ्याल, अशी अपेक्षा आहे, असे म्हणत भाजपच्या राज्य महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

खोटं बोलल्याचं प्रायश्चित्त घ्याल?

चित्रा वाघ यांनी आपल्या 'X' पोस्टवर म्हटलं आहे, " ओ ऽऽऽऽऽमोठ्ठया ताई, संसद भवन परिसरातून राष्ट्रपुरुषांचे फोटो हटवले यावरुन सुप्रिया सुळे यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट केली होती. याला प्रत्त्यु्त्तर चित्रा वाघ यांनी दिले आहे. त्यांनी म्हटलं आहे की,

आपले महापुरूष तुमच्यासाठी केवळ प्रचारात मिरवण्याची गोष्ट असेल. आमच्यासाठी ते प्रातःस्मरणीय आहेत. त्यामुळे संसदेच्या प्रांगणातले पुतळे हटवले जात असल्याचं असत्य पसरवून उगाच 'ध'चा 'मा' करणाऱ्या आधुनिक आनंदीबाई बनू नका. हे पुतळे नवीन जागी हलवले जाताहेत, हटवले जात नाहीयेत. आत्मनिर्भर भारताच्या स्वाभिमानाची खूण म्हणजे नवीन संसद भवन. ज्यावर तुम्हीच बहिष्कार घातला होता.

कारण तुम्हाला इंग्रजांनी उभारलेले जुने संसद भवन प्रिय होते. आता मात्र तुम्हाला जळजळतंय. आता सहन न झाल्यानेच खोट्या बोंबा मारणं, थापा मारणं सुरू केले आहे. या थापांचा बाप कोण हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे? भारतीय जनता पक्षाचा विचार आणि संस्कार आत भिनलेले असतात आणि विरोधकांचे विचार हे प्रचार आणि फार फार तर वचननाम्यापुरतेच झळकतात. म्हणूनच तर स्टंटबाजीत तुमच्याकडून श्रद्धेय बाबासाहेबांचा फोटो फाडला जातो. शिवरायांचा खोटा इतिहास नव्याने लिहिण्यात काँग्रेसचा हात तर कोणीच धरू शकत नाही. लवकरच संसदेत पाऊल ठेवाल, तेव्हा या महापुरूषांसमोर नतमस्तक होऊन खोटे बोलल्याचे प्रायश्चित्त घ्याल, अशी अपेक्षा आहे. Maharashtra Politics

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या ?

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटले आहे, "संसद भवन परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे भव्य पुतळे हटविण्यात आले. हे अतिशय संतापजनक आहे. हे सर्व पुतळे भारतीय नागरीकांनी राष्ट्रपुरुषांवरील प्रेमातून संसद भवन परिसरात उभारले होते. सरकारने हे पुतळे हटवून तमाम देशवासियांचा अपमान केला आहे. विशेष म्हणजे आज शिवरायांचा राज्याभिषेक दिन असताना ही घटना उघडकीस यावी, यासारखा दुसरा दैवदुर्विलास नाही.

जाहीर निषेध! " Maharashtra Politics

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news