Rahul Gandhi: राहुल गांधी आज बंगळूर न्यायालयात हजर होणार, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Rahul Gandhi: राहुल गांधी आज बंगळूर न्यायालयात हजर होणार, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

पुढारी ऑनलाईन डेस्क: भाजपच्या कर्नाटक युनिटने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला उत्तर म्हणून राहुल गांधी बंगळूर येथील विशेष न्यायालयात आज (दि.७ जून) हजर होणार आहेत. यासाठी ते बंगळूर विमानतळावर पोहचले. दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे स्वागत केले.

गेल्या वर्षी, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर, काँग्रेसने एका जाहिरातीत राज्यातील तत्कालीन भाजप सरकारवर २०१९-२०२३ च्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. न्यायालयाने या प्रकरणात सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना 1 जून रोजी जामीन मंजूर केला होता. या प्रकरणी राहुल गांधी यांना ७ जून रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

काय होतं संपूर्ण प्रकरण?

या काँग्रेस नेत्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह भाजप नेत्यांविरोधात खोट्या जाहिराती दिल्याचा आरोप करत भाजपने मानहानीचा खटला दाखल केला होता.

राहुल गांधींनी "निंदनीय जाहिरात" पोस्ट केल्याचा भाजपचा आरोप

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, भाजपने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, सर्व सार्वजनिक कामांमध्ये 40 टक्के कमिशन घेतल्याचा आरोप करत काँग्रेसने मागील सरकारच्या विरोधात 'भ्रष्टाचार दर कार्ड' प्रकाशित केले होते. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील त्यांच्या अकाऊंटवर ही "निंदनीय जाहिरात" पोस्ट केल्याचा आरोप भाजपने केला होता.

मानहानी खटल्यात राहुल गांधींना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश

1 जून रोजी बंगळूर न्यायालयाने सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना जामीन मंजूर केला होता, जेव्हा ते या प्रकरणात हजर झाले होते. हा आदेश जारी करताना न्यायाधीश केएन शिवकुमार यांनी राहुल गांधींना ७ जून रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news