आमचा ‘एनडीए’ सरकारला बिनशर्त पाठिंबा : जेडीयूची स्‍पष्‍टोक्‍ती

माध्‍यमाशी बाेलताना जनता दल संयुक्‍त (जेडीयू )चे प्रवक्‍ते के. सी. त्‍यागी.
माध्‍यमाशी बाेलताना जनता दल संयुक्‍त (जेडीयू )चे प्रवक्‍ते के. सी. त्‍यागी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीचे आम्‍ही घटकपक्ष आहोत. आम्‍ही एनडीए सरकारला बिनशर्त आणि कोणतीही पूर्वअट न ठेवता पाठिंबा दिला आहे, असे जनता दल संयुक्‍त (जेडीयू )चे प्रवक्‍ते के. सी. त्‍यागी यांनी आज माध्‍यमांशी बोलताना स्‍पष्‍ट केले. बिहारला विशेष राज्‍याचा दर्जा मिळावा, अशी आमच्‍या पक्षाची इच्‍छा आहे, असेही त्‍यांनी नमूद केले.

यावेळी के. सी. त्‍यागी म्‍हणाले की, "देशातील सर्वच राजकीय पक्षांचा जातनिहाय जनगणनेला विरोध नाही. सर्वांनी याला संमतीच आहे. बिहारने मार्ग दाखवला आहे. जातनिहाय जनगणना व्‍हावी, अशी मागणी करणार्‍या सर्वपक्षीय शिष्‍टमंडळातही पंतप्रधानांनी विरोध केलेला नाही. जातनिहाय जनगणना ही काळाजी गरज आहे. आम्‍ही त्‍याचा पाठपुरावा करु."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news