

पुढारी ऑनलाईन डेस्क: आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्षाने निर्णायक आघाडी मिळवली आहे. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडूंच्या 'टीडीपी'ने बहुमताचा आकडा गाठला आहे. तेलुगू देसम पक्ष 127 जागांवर आघाडीवर आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत बहुमताचा आकडा ८८ आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाला २१ जागांवर आघाडीवर, जनता सेना २० जागांवर आघाडीवर, तर भाजप ७ जागांवर आघाडीवर आहे.
आंध्र प्रदेश विधानसभेतचे निकाल समोर येत असून, चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपीने १२७ असा बहुमतांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशात सत्ताबदल होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी, पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष आणि भाजप राज्यात एकत्र निवडणुका लढवत आहेत. एनडीएची थेट स्पर्धा आंध्र प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाशी होती. सध्याच्या आकडेवारीनुसार, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींना मोठा धक्का बसण्याची अधिक शक्यता आहे.