Lok Sabha Election 2024| दिल्लीमध्ये सर्व जागांवर भाजपा आघाडीवर | पुढारी

Lok Sabha Election 2024| दिल्लीमध्ये सर्व जागांवर भाजपा आघाडीवर

  • ईशान्य दिल्लीतून भाजपचे मनोज तिवारी आघाडीवर आहेत, तिवारी यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार कन्हैया कुमार पिछाडीवर आहेत.

पुढारी ऑनलाईन डेस्क: आज सकाळी ८ वाजेपासून १८ व्या लोकसभा निवडणूक मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मतमोजणीचे पहिले कल समोर आले असून, दिल्लीत सर्व जागांवर भाजपा आघाडीवर (Lok Sabha Election 2024) असल्याचे स्पष्ट होत आहे.

दिल्लीत ७ लोकसभा मतदारसंघ असूनही दिल्लीला राजकीय महत्त्व आहे. दिल्लीत काँग्रेस आणि आप एकत्र भाजपविरुद्ध लोकसभा निवडणूक लढत आहे. दिल्लीत लोकसभेसाठीच्या  सर्व जागांवर भाजपा आघाडी मिळवत असल्याचे चित्र आहे. 2014 आणि 2019 मध्ये सर्व सात जागा जिंकून भाजपने दिल्लीतील गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये वर्चस्व (Lok Sabha Election 2024) राखले आहे.

आम आदमी पार्टी पूर्व दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि नवी दिल्ली या चार मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. तर चांदनी चौक, ईशान्य दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्ली या उर्वरित तीन मतदारसंघांमध्ये (Lok Sabha Election 2024) काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत.

 

Back to top button