IndiGo receives Bomb threat: चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या ‘इंडिगो’ फ्लाइटला बॉम्बने उडवण्याची धमकी

IndiGo flight
IndiGo flight
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: विमानवाहतूक कंपनी इंडिगोने आज (दि.१) एक प्रेसनोट जारी केली आहे. यामध्ये त्यांनी चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो 6E 5314 फ्लाइटला बॉम्ब असल्याची धमकी (IndiGo receives Bomb threat) मिळाली आहे. इंडिगोच्या कर्मचाऱ्याला फ्लाइटच्या स्वच्छतागृहात बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार या विमानात एकूण 172 प्रवासी होते. अशी माहिती कंपनीने प्रसिद्ध कलेल्या निवेदनात दिली आहे, या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

पुढे वृत्तात म्हटले आहे की, विमान मुंबईत उतरल्यानंतर क्रुने प्रोटोकॉलचे पालन करत, सुरक्षा एजन्सीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमान एका विलगीकरण खाडीत नेण्यात आले. सर्व प्रवासी सुखरूप विमानातून उतरले आहेत. विमानाची सध्या तपासणी सुरू आहे. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर, विमान टर्मिनल परिसरात परत आणले जाईल, असे देखील कंपनीने (IndiGo receives Bomb threat) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

गेल्या काही दिवसातील 'ही' तिसरी घटना

यापूर्वी काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे दोनवेळा फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. यामध्ये एका प्रकरणात स्वच्छतागृहातच चिठ्ठी सापडली होती. दिल्लीहून बनारसला जाणाऱ्या विमानालाही अशीच धमकी मिळाली होती. दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. आता शनिवारी चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये अशीच एक चिठ्ठी सापडली. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

यापूर्वी दिल्ली-श्रीनगर विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा

विस्तारा कंपनीच्या दिल्ली – श्रीनगर विमानात बॉम्ब ठेवला असल्याची धमकी मिळाल्यामुळे शुक्रवारी प्रवाशांमध्ये भीतीचे काहूर उठले. या धमकीनंतर तपास करताना विमानतळ अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. दिल्लीतून विस्तारा कंपनीचे UK-611 विमान १७८ प्रवासी घेऊन श्रीनगरला रवाना झाले. त्यावेळी हवाई वाहतूक नियंत्रकांना विमानात बॉम्ब असल्याचा धमकीचा कॉल (IndiGo receives Bomb threat) आला. मात्र, धमकीनंतर शोधाशोध आणि तपास केल्यानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील अनेक रुग्णालये, शाळा, महाविद्यालये बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. असे वृत्त माध्यमातून समोर आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news