मेधा पाटकर मानहानीच्या खटल्यात दोषी: साकेत न्यायालयाचा निर्णय | पुढारी

मेधा पाटकर मानहानीच्या खटल्यात दोषी: साकेत न्यायालयाचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीच्या साकेत न्यायालयाने नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar)  यांना केव्हीआयसीचे तत्कालीन अध्यक्ष व्ही. के. सक्सेना यांच्या २० वर्षे जुन्या मानहानीच्या खटल्यात आज (दि.२४) दोषी ठरवले आहे. केव्हीआयसीचे तत्कालीन अध्यक्ष आणि दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्या वतीने पाटकर यांच्याविरुद्ध मानहानीच्या खटल्यात याचिका दाखल करण्यात आली होती.

नायब राज्यपालांच्या याचिकेवर न्यायालयाने मेधा पाटकर (Medha Patkar)  यांना दोषी ठरवले आहे. साकेत न्यायालयाचे महानगर दंडाधिकारी राघव शर्मा यांनी पाटकर यांना गुन्हेगारी मानहानीप्रकरणी दोषी ठरवले. त्यांना दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
काय प्रकरण आहे.

2003 मध्ये सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर ‘नर्मदा बचाव आंदोलन’मध्ये सक्रिय होत्या. त्याच वेळी व्हीके सक्सेना नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीजमध्ये सक्रिय होते. त्यावेळी त्यांनी मेधा पाटकर यांच्या आंदोलनाला कडाडून विरोध केला होता. मानहानीचा पहिला खटला याशी संबंधित आहे. मेधा पाटकर यांनी व्हीके सक्सेना यांच्या विरोधात आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या जाहिरातीबाबत मानहानीचा खटला दाखल केला होता. सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्यावर अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल मानहानीचे दोन खटले दाखल केले होते.

हेही वाचा 

Back to top button