सिंगापूरमधील कोरोनाच्या KP1, KP2 व्हेरियंटने भारताची चिंता वाढविली | पुढारी

सिंगापूरमधील कोरोनाच्या KP1, KP2 व्हेरियंटने भारताची चिंता वाढविली

पुढारी ऑनलाईन डेस्क: सिंगापूरमधील कोरोनाच्या नव्या लाटेमुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. सिंगापूरमध्ये आढळून आलेला कोरोनाचे नवा प्रकार भारतातही आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. भारतात कोरोना प्रकार KP1 चे 34 आणि KP2 चे 290 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, असे इंडियन सार्स कोविड-2 जीनोमिक्स कंसोर्टियमच्या डाटावरून समोर आले आहे.

कोरोनाच्या KP1, KP2 व्हेरियंटची लक्षणे काय?

  • KP1 आणि KP2 हे कोरोनाच्या JN1चा उप-प्रकार आहे.
  • या आजाराची गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत.
  • रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी आहे.
  • या प्रकारांमध्ये उत्परिवर्तनाची प्रक्रिया सुरूच राहणार आहे.

या राज्यांमध्ये रुग्ण आढळले.

देशातील सात राज्यांमध्ये KP1 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी सर्वाधिक 23 प्रकरणे पश्चिम बंगालमध्ये आढळून आली आहेत. गोवा (1), गुजरात (2), हरियाणा (1), महाराष्ट्र (4), राजस्थान (2), उत्तराखंड (1) मध्ये KP1 संक्रमित रुग्ण आढळले आहेत. देशात KP2 ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 290 आहे, त्यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (148) आढळून आले आहेत. तसेच दिल्ली (1), गोवा (12), गुजरात (23), हरियाणा (3), कर्नाटक (4), मध्य प्रदेश (1), ओडिशा (17), राजस्थान (21), उत्तर प्रदेश (8), उत्तराखंडमध्ये (16) पश्चिम बंगालमध्ये (36) रुग्ण आढळले आहेत.

रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे दिसत नाहीत

आरोग्य मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, KP1 आणि KP2 हे देखील कोरोनाच्या JN1 प्रकाराचे उप-प्रकार आहेत. मात्र, या प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांमध्ये अद्याप या आजाराची गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी आहे. अशा परिस्थितीत काळजी करण्यासारखे काही नाही. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, या प्रकारांमध्ये उत्परिवर्तनाची प्रक्रिया सुरूच राहील आणि हे कोरोना विषाणूचे स्वरूप देखील आहे.

हेही वाचा 

Back to top button