Delhi Lok Sabha: अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या लोकसभा निवडणूकीचा मूड बदलला

Delhi Lok Sabha: अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या लोकसभा निवडणूकीचा मूड बदलला

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत लोकसभेच्या सातही जागांवर इंडिया आघाडी आणि भाजपमध्ये थेट लढत होताना दिसत आहे. यापूर्वी या सात जागांवर भाजपची विजयाकडे सहज वाटचाल सुरू होती. पण केजरीवाल (Delhi Lok Sabha) यांच्या तुरुंगातून जामीनावर सुटकेने निवडणुकीचे चित्र बदलले आहे.

काँग्रेसही पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरली आहे. काँग्रेस आणि आप आघाडीने जोरदार प्रचाराची रणनीती तयार केली आहे. आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी लवकरच एकत्रित प्रचार करताना दिसणार आहेत. दोन्ही नेते रोड शो किंवा संयुक्त जाहीर सभेद्वारे दिल्लीतील (Delhi Lok Sabha) सातही जागांवर काँग्रेस-आप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

Delhi Lok Sabha: संयुक्त रोड शो किंवा जाहीर सभेबाबत दोन्ही पक्षात चर्चा

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष देवेंद्र यादव आणि आपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये संयुक्त निवडणूक प्रचाराबाबत चर्चा झाली आहे. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचा संयुक्त रोड शो किंवा जाहीर सभेबाबतही (Delhi Lok Sabha) दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. काँग्रेस आणि आपच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर या संयुक्त प्रचाराची तारीख लवकरच निश्चित केली जाणार आहे.

दिल्लीत काँग्रेस-आपमध्ये जागांचे अशाप्रकारे वाटप

दिल्लीत काँग्रेस तीन लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. चांदनी चौक, उत्तर पश्चिम दिल्ली, उत्तर पूर्व दिल्ली येथे काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत. तर आप नवी दिल्ली, पूर्व दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. चांदनी चौक आणि उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जेपी अग्रवाल आणि उदित राज यांनी नुकतीच अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यादरम्यान केजरीवाल यांनी दोन्ही नेत्यांच्या मतदारसंघात रोड शो करण्याचे आश्वासन दिले आहे.

काँग्रेस-आपने संयुक्त प्रचार केल्यास दोन्ही पक्षांना फायदा

तसेच, कन्हैया कुमार काँग्रेसच्या तिकीटावर ईशान्य दिल्लीतून निवडणूक लढवत आहेत. कन्हैया कुमार यांनी अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली आहे. केजरीवाल कन्हैया कुमार यांच्या समर्थनार्थ जाहीर सभाही घेणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस-आपने दिल्लीत संयुक्त प्रचार केला तर त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होईल, असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. हरियाणातही काँग्रेस आणि आपचा एकत्रित निवडणूक प्रचार होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. हरियाणात काँग्रेस नऊ जागांवर तर आप एका जागेवर निवडणूक लढवत आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news