Narendra Modi: ‘आई गंगाने मला दत्तक घेतलंय’, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पीएम मोदी भावूक

Narendra Modi
Narendra Modi

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.१४) वाराणसीमधून लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. ते याच मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. आगामी लोकसभेसाठी नरेंद्र मोदी (Narendra Modi) वाराणसीमधून भाजपचे उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी 'आई गंगानेच आता मला दत्तक घेतलंय', असे म्हणत ते भावूक झाले. नरेंद्र मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करताना यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रमुख उपस्थिती होती.

अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींकडून गंगापूजन

लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दशाश्वमधघाटावर गंगापूजन केले. वाराणसीतील कालभैरव मंदिरात पूजा देखील केली. त्यानंतर त्यांनी वाराणसी येथील जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात दाखल होत, उमेदवारी अर्ज दाखल केला. यासाठी एएनडीएतील मित्रपक्षातील प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

पीएम मोदींनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरला

  • वाराणसी मतदारसंघासाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात शनिवार १ जून रोजी मतदान होत आहे
  • भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
  • पंतप्रधान मोदी वाराणसी मतदारसंघातून भाजपकडून तिसऱ्यांदा  निवडणूक लढवत आहेत. 
  • काँग्रेसने पीएम मोदी यांच्या विरोधात प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना वाराणसीतून उमेदवारी दिली आहे.  

एनडीए मित्रपक्षातील प्रमुखांची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) उमेदवारी अर्ज भरताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. १२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही यावेळी उपस्थिती दर्शवली. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पीएम मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थिती दर्शवली.

वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी

वाराणसी मतदारसंघासाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात शनिवार १ जून रोजी मतदान होणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा भाजपकडून वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 2014 आणि 2019 मध्ये ते येथून खासदार म्हणून निवडून आले होते.

हे ही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news