.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : देश आज ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. प्रत्येक भारतीय स्वातंत्र्याच्या या उत्सवात सहभागी होत आहे. गुगलही दरवर्षी हा दिवस डूडलच्या माध्यमातून साजरा करते. यावेळीही गुगल स्वातंत्र्यदिन विशेष डूडलद्वारे साजरा करत आहे. यावेळची थीम काय आहे जाणून घ्या...
स्वातंत्र्य दिन २०२४ ची थीम आर्किटेक्ट म्हणून ठेवण्यात आली आहे. कलाकृतीमध्ये कंपनीच्या नावाची 'G', 'O', 'O', 'G', 'L' आणि 'E' अक्षरे प्रत्येक दरवाजावर वेगळ्या डिझाइनसह दर्शविली आहेत. डूडलमध्ये तुम्ही वेगवेगळ्या खिडक्या आणि दरवाजे देखील पाहू शकता. आजच्या विशेष डूडलमध्ये विविध प्रकारच्या रचना आहेत आणि देशातील विविध संस्कृती एकाच धाग्यात एकत्र दाखवल्या गेली आहे. त्याची रचना वृंदा जावेरी यांनी केली आहे. वृंदा जावेरी या अमेरिकेत राहतात. त्या एक फ्रीलान्स आर्ट डायरेक्टर आणि व्यवसायाने ॲनिमेटर आहेत.
१९४७ मध्ये या दिवशी भारताला वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले, असे गुगलने एका नोटमध्ये म्हटले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, भारतातील लोकांना सुमारे दोन शतकांच्या असमानता, हिंसाचार आणि मूलभूत अधिकारांच्या अभावानंतर स्वराज्य आणि सार्वभौमत्व हवे होते. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांसारख्या प्रमुख व्यक्तींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य चळवळ होती. सविनय कायदेभंगामुळे ते शक्य झाले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे समर्पण आणि बलिदान फळाला आले, असे त्यात म्हटले आहे.
स्वातंत्र्यदिनी लोक ध्वजारोहण समारंभ, परेड, संगीत कार्यक्रम, सामुदायिक रॅली इत्यादींमध्ये सहभागी होतात. घरे, इमारती, रस्ते आणि वाहने राष्ट्रध्वजाने सजवली जातात. लोक जन गण मन हे राष्ट्रगीत देखील गातात. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.