

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या 93 मतदारसंघांमध्ये सुमारे 50.71 टक्के मतदान झाले. दुपारी 3 वाजेपर्यंतच्या ECI डेटानुसार पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 63.11 टक्के मतदान झाले आहे आणि सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात 42.63 टक्के इतके नोंदवले गेले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Lok Sabha Election 2024)
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यनिहाय टक्केवारी अशी: आसाम-63.08 टक्के, बिहार-46.69 टक्के, छत्तीसगड-58.19 टक्के, गोवा-61.39 टक्के, गुजरात -47.03 टक्के, कर्नाटक-54.20 टक्के, मध्य प्रदेश-54.09 टक्के आणि उत्तर प्रदेश-46.78 टक्के तर केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 52.43 टक्के मतदान झाले. (Lok Sabha Election 2024)
महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये सर्वाधिक 51.51 टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी बारामतीमध्ये 34.96 टक्के मतदान झाली आहे. महाराष्ट्रातील उर्वरित ९ जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे;