Lok Sabha election : लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी उज्ज्वल निकम यांचा सरकारी वकील पदाचा राजीनामा

Lok Sabha election : लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी उज्ज्वल निकम यांचा सरकारी वकील पदाचा राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ॲड. उज्‍ज्‍वल निकम यांना भाजपकडून उत्तर-मध्य मुंबईमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यापूर्वी ते विशेष सरकारी वकील म्हणून सर्व खटल्यांच्या जबाबदारीतून पायउतार झाले आहेत. त्यांनी याबाबत राजीनामा सादर केला आहे. उज्‍ज्‍वल निकल यांना उमेदवारी दिलेल्या मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Lok Sabha election)

ॲड. उज्ज्वल निकम हे 1993 मधील बॉम्बस्फोट, 26/11 चा दहशतवादी हल्ला आणि औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणाशी संबंधित खटले सरकारी वकील म्हणून हाताळत होते. परंतु गरज पडल्यास विशेष सरकारी वकील म्हणून ते हे खटले पुन्हा हाती घेतील, असेही उज्‍ज्‍वल निकम यांनी म्हटले आहे. (Lok Sabha election)

ॲड. उज्ज्वल निकम यांनी १९९३ चा मुंबई बाँबस्फोट खटला, मुंबईवरील अतिरेकी हल्ला यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये राज्य सरकारची यशस्वीपणे बाजू मांडली आहे. खैरलांजी, सोनई येथील दलितांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये आरोपींना कठोर शासन घडविण्यासाठी त्‍यांचे योगदान आहे. दरम्यान महायुतीसाठी मुंबईतील सर्वात कठीण मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपने निकम यांची निवड केल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news