भारतात सुवर्णालंकारांची 3 महिन्यांत 95.5 टन विक्री | पुढारी

भारतात सुवर्णालंकारांची 3 महिन्यांत 95.5 टन विक्री

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय रिझर्व्ह बँक सोने खरेदीत जगात तिसर्‍या स्थानी आहे. दुसरीकडे, देशातील लोकांचे सोन्याचे आकर्षणही कमी झालेले नाही. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, यंदा जानेवारी-मार्च या 3 महिन्यांत भारतात सोन्याच्या दागिन्यांची विक्री गतवर्षाच्या तुलनेत 4 टक्क्यांनी वाढली आहे.

या 3 महिन्यांत 95.5 टन विक्री झाली आहे. गतवर्षी याच काळात ही विक्री 91.9 टन होती. जगभरात मात्र या काळात सोन्याच्या दागिन्यांची मागणी 2 टक्क्यांनी कमी झाली. जगभरात या 3 महिन्यांत 479 टन दागिने विक्री झाली. चीनमध्येही दागिन्यांची मागणी गतवर्षीच्या जानेवारी-मार्चच्या तुलनेत यंदा 6 टक्क्यांनी कमी होऊन 184.2 टन झाली आहे. रिझर्व्ह बँकेने 3 महिन्यांत 19 टन सोने खरेदी केले. गतवर्षी बँकेने याच काळात 16 टन सोने खरेदी केली होती.
जगभरातील बँकांमध्ये सोन्याचा साठा 290 टनांनी वाढला आहे.

देशनिहाय सोने खरेदी
तुर्की : 30 टन
चीन : 27 टन
भारत : 19 टन
कझाकिस्तान : 16 टन
झेक प्रजासत्ताक : 5 टन
(आकडे जानेवारी-मार्च 2024 चे)

Back to top button