Sex Tapes Row : कथित सेक्स स्कँडल प्रकरणी खासदार प्रज्वल रेवन्ना JDS मधून निलंबित | पुढारी

Sex Tapes Row : कथित सेक्स स्कँडल प्रकरणी खासदार प्रज्वल रेवन्ना JDS मधून निलंबित

पुढारी ऑनलाईन डेस्क : कथित सेक्स स्कँडल प्रकरणी आरोप असलेले माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षातून आज (दि.३०) निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत प्रज्वल यांचे निलंबन कायम राहणार आहे, असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडी(एस) नेते एचडी कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. Sex Tapes Row

कर्नाटकातील एका भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. मला सरकारी अधिकाऱ्यांसह महिलांचे सुमारे ३ हजार व्हिडिओ असलेले पेन ड्राइव्ह मिळाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये राज्याच्या पक्षाध्यक्षांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (former Prime Minister and JD(S) supremo HD Deve Gowda) यांचे नातू तसेच कर्नाटकातील हसन लोकसभा खासदार आणि जेडीएसचे (जनता दल सेक्युलर) उमेदवार प्रज्ज्वल रेवन्ना यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला होता. Sex Tapes Row

या फुटेजचा वापर महिलांना ब्लॅकमेल करून त्यांना सतत लैंगिक कृत्यांमध्ये गुंतण्यासाठी केला असल्याचाही आरोप रेवन्ना यांच्यावर करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त ‘इंडिया टुडे‘ने दिले आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तसे आदेशही जारी केले आहेत.

प्रज्ज्वल यांचे महिलांसह आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाले. महिलांवर दबाव आणून त्यांचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा सूर उमटला. पीडितांमध्ये काही शासकीय कर्मचारी असल्याचेही सांगण्यात येते. यानंतर कर्नाटक राज्य महिला आयोगाने २६ एप्रिल रोजी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. विशेष तपास पथक नेमावे, असेही राज्य सरकारला सुचविले होते. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावरून या प्रकरणावर भाष्यही केलेले आहे. दुसरीकडे प्रज्वल रेवन्ना शनिवारी सकाळीच जर्मनीला रवाना झाले आहेत. प्रज्ज्वल हे २०१९ मध्ये निवडून आलेले सर्वांत कमी वयाचे (२९) खासदार ठरले होते.

 

हेही वाचा 

Back to top button