कोल्हापूर : विहिरीत पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : विहिरीत पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

मुरगूड; पुढारी वृत्तसेवा : चिमगाव ( ता. कागल ) येथे विहीरीत पोहण्यासाठी गेलेल्या प्रसाद रामचंद्र करडे (वय १५ ) याचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. नववीची परीक्षा नुकतीच दिलेल्या प्रसादची एक्झीट चटका लावणारी असून त्याच्या मृत्यूमुळे चिमगाव गावात शोककळा पसरली आहे. घटनेची मुरगूड पोलीसात नोंद झाली आहे .

प्रसाद आज दुपारी बाराच्या सुमारास आपल्या सवंगडयासह गावाजवळील वगदे नावाच्या विहिरीत पोहण्यास गेला होता. त्याने विहिरीच्या पाण्यात सुळकी उडी मारली असता, गाळात अडकलेने त्यांचे नाकातोंडात पाणी गेले. तो वरती लवकर न आल्याने त्याच्याबरोबर आलेल्या मुलांनी आरडाओरडा केला. त्यानंतर अमरदिप भगतसिंग एंकल व आंनदा बाबू करडे यांनी प्रसादला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मुरगूड येथे दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेची मुरगूड पोलीसात नोंद झाली आहे

प्रसाद हा एकुलता एक असून त्याला दोन बहिणी आहेत. प्रसादच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. प्रसाद मुरगूडच्या शिवराज हायस्कूलमध्ये इयता नववीच्या वर्गात होता . त्याने नववीची परीक्षा नुकतीच दिली होती . उद्या दि .१ रोजी त्याचा नववीचा निकाल होता . दहावीच्या वर्गात जाण्याचे व चांगले यश मिळविण्याचे त्याचे ध्येय अधुरेच राहिले . तो एनसीसीचा उत्कृष्ट कॅडेट होता . त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

Back to top button