भारताकडे येत असलेल्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला

भारताकडे येत असलेल्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारताकडे येत असलेल्या एका जहाजावर शनिवारी लाल समुद्रात क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. याची जबाबदारी येमेनच्या हुती बंडखोरांनी घेतली आहे. अँड्रोमेडा स्टार असे जहाजाचे नाव आहे. हे जहाज भारताकडे तेल घेऊन येत होते. याबाबतची माहिती जहाजाच्या प्रमुखांनी दिली असून, हल्ल्यामुळे जहाजाचे मोठे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. हे जहाज ब्रिटनचे असून, यावर टीगुआ आणि बार्बाडोसचा झेंडा लावला होता. हल्ला होऊन जहाज पुढे जात आहे. हे जहाज रशियातून प्रिमोर्स्कहून निघाले असून, ते गुजरातच्या वाडीनार बंदरात पोहोचणार आहे.

भारताकडे येत असलेल्या जहाजावर दोन वेळा हल्ला करण्यात आला आहे. यादरम्यान, हुती बंडखोरांनी जहाजावर अनेक क्षेपणास्त्रे डागली. पण, डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे जहाजावर पडण्याऐवजी समुद्रात पडली. दुसर्‍या हल्ल्यात मात्र जहाजाचे किरकोळ नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. लाल महासागरात बर्‍याच दिवसांपासून शांतता प्रस्थापित झाली असताना आता अचानक हल्ला करण्यात आला आहे. यापूर्वी इस्रायलचा इराणबरोबर झालेल्या संघर्षामुळे भारतात येत असलेले एक जहाज ताब्यात घेण्यात आले होते. कोणत्याही परवानगी शिवाय हे जहाज आमच्या समुद्री हद्दीत घुसले होते, असा दावा इराणने केला होता.

अमेरिकेच्या ड्रोनलाही केले लक्ष्य

हुती बंडखोरांनी भारताकडे येत असलेल्या जहाजावरच नाही, तर अमेरिकेच्या एमक्यू-9 या ड्रोनवरही हल्ला केला. दर वर्षाला जागतिक व्यापारातील सुमारे 12 ते 30 टक्के व्यापार लाल महासागरातील सुएज कालव्यातून होतो. पण, हुती बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे युरोप आणि आशियातील या मार्गावर होत असलेल्या व्यापारावर परिणाम होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news