Arvind Kejriwal: केजरीवालांना २३ दिवस इन्सुलिन का दिले नाही? असा सवाल करत ‘आप’ची निदर्शने | पुढारी

Arvind Kejriwal: केजरीवालांना २३ दिवस इन्सुलिन का दिले नाही? असा सवाल करत 'आप'ची निदर्शने

पुढारी ऑनलाईन डेस्क: तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या शरिरातील राखरेचे प्रमाण वाढल्याने त्यांनी तुरुंगात इन्सुलिन पुरवण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने केजरीवालांची ही मागणी फेटाळली. यानंतर शासकीय वैद्यकीय मंडळाच्या तपासानंतर त्यांना तुरुंगात इन्सुलिन देण्यात आले. दरम्यान केजरीवालांना २३ दिवस इन्सुलिन का दिले नाही? असा प्रश्न करत आम आदमी पक्षातील डॉक्टर विंगने भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत दिल्लीत निदर्शने केली. (Arvind Kejriwal)

अरविंद केजरीवाल हे दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून तिहार तुरुंगात आहेत. दरम्यान त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण (शुगर लेव्हल) वाढले. त्यामुळे केजरीवालांनी याचिकेद्वारे डॉक्टरांचा सल्ला आणि इन्सुलिनची मागणी केली. परंतु न्यायालयाने केजरीवालांची मागणी फेटाळत. तुरुंग प्रशासन अधिकारी एम्स रुग्णालयातील डॉक्टरांचे एक वैद्यकीय मंडळ नेमले. यानंतर त्यांना तुरुंगात इन्सुलिन देण्यात आले. त्यानंतर आज (दि.२४) केजरीवालांना इन्सुलिन न दिल्याच्या विरोधात आम आदमी पार्टीची डॉक्टर शाखा आणि नेत्यांनी निदर्शने केली. ‘आप’च्या डॉक्टर विंगने भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत ‘जेल का जवाब वोट में’ (जेलचे उत्तर मतांमध्ये) असे बॅनर हातामध्ये घेत निदर्शने केली. (Arvind Kejriwal)

पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार कुलदीप कुमार म्हणाले की, भाजप निष्पक्ष निवडणुकांपासून पळत आहे, म्हणूनच ते दिल्लीचे पुत्र अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही पुराव्याशिवाय आणि पुनर्प्राप्तीशिवाय तुरुंगात ठेवत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीशी का खेळले जात आहे, त्यांना 23 दिवस इन्सुलिन का देण्यात आले नाही, हे भाजपने सांगावे? असा सवाल देखील त्यांनी मोदी सरकारला केला आहे.

भाजप नेते अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, दिल्लीची जनता याला मतांनी उत्तर देईल, असे आप उमेदवार म्हणाले. केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला मोफत वीज, पाणी, उत्कृष्ट आरोग्य, शिक्षण, महिलांना बस प्रवास यासह अनेक सुविधा दिल्या आहेत. पण आज त्यांच्या आरोग्याशी हेळसांड होत असल्याच्या भावना आप नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Back to top button