सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार, नाना पाटोलेंची माहिती | पुढारी

सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार, नाना पाटोलेंची माहिती

अकोल, पुढारी वृत्तसेवा : सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करत 25 एप्रिल च्या बैठकीत याबाबत ठरवू असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना अकोल्यात सांगितले.

एका प्रश्नाच्या उत्तरात नाना पटोले बोलत होते . त्यांना विचारले असता ते म्हणाले विशाल पाटील यांची मनधरणी करण्यात आली होती .मात्र कुणीतरी त्यांना फुस लावत आहेत .या संदर्भात 25 एप्रिल ला काँग्रेसची बैठक होणार आहे .यामध्ये विशाल पाटील यांच्यावर पक्षविरोधी वागल्या कारणाने कारवाई करण्याबाबत निर्णय घेऊ अशी माहिती नाना पाटोले यांनी बोलताना सांगितली

Back to top button