छत्तीसगड : निवडणूक ड्युटीवरून परतणाऱ्या CRPF जवानांची बस उलटली | पुढारी

छत्तीसगड : निवडणूक ड्युटीवरून परतणाऱ्या CRPF जवानांची बस उलटली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : छत्तीसगडमधील बस्तर बस्तर येथे रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. जगदलपूरमध्ये फरासपाल येथून निवडणूक ड्युटीवरून परतणाऱ्या सैनिकांनी भरलेल्या बसला अपघात झाला. बस उलटल्याने सीआरपीएफचे 10 जवान जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी बसमध्ये 36 जवान प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. यानंतर जखमी जवानांना तातडीने बसमधून बाहेर काढण्यात आले.

सर्व जखमी जवानांना मेडिकल कॉलेज, डिमरपाल येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. टोकापल ब्लॉकच्या दिलमिली राष्ट्रीय महामार्गाजवळ ही घटना घडली. रस्त्याच्या मधोमध अचानक गुरे आल्याने बस चालकाने नियंत्रण सुटले आणि अपघात झाला, असे सांगण्यात येत आहे. हा संपूर्ण प्रकार कोडनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

Back to top button