पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगात इन्सुलिन पुरवण्यासाठी राऊस एव्हेन्यू कोर्टात याचिका दाखल केली. यावर आज (दि.१९) दुपारी विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. परंतु न्यायालयाने केजरीवालांच्या मागणी याचिकेवरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. (Arvind Kejriwal)
न्यायालयाने तुरुंग प्रशासन, ईडी आणि केजरीवांलांच्या वकिलांचे म्हणणे ऐकूण घेत, अरविंद केजरीवाल यांच्या तुरुंगात इन्सुलिन मागणी आणि डॉक्टरांसोबत व्हिसीच्या मागणीवरील निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाने सोमवार 22 एप्रिल 2024 रोजी या संदर्भातील निर्णय दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे, तसेच तिहार तुरुंग प्रशासन आणि ईडीला उद्यापर्यंत तपशीलवार उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. (Arvind Kejriwal)
दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मधुमेहाच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे तुरुंग अधिकाऱ्यांना इन्सुलिन देण्याचे निर्देश द्यावेत आणि त्याचा तीव्र मधुमेह आणि रक्तातील साखरेच्या चढ-उताराच्या संदर्भात दररोज 15 मिनिटे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सल्लामसलत करण्याची परवानगी द्यावी. तसेच व्हीसीमध्ये पत्नीला देखील सहभागी होण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे न्यायालयाकडे केले आहे. (Arvind Kejriwal)
दरम्यान काल (दि.१८) ईडीने अरविंद केजरीवाल हे जाणूनबुजून त्यांची साखरेची पातळी वाढवण्यासाठी तुरुंगात "आंबे आणि मिठाई" खात आहेत, असा आरोप केला होता.