

पुढारी ऑनलाईन डेस्क: बिहारमधील पाटण्यात आज (दि.१६) भीषण अपघात घडला आहे. मेट्रोसाठी काम करणाऱ्या क्रेन आणि ऑटोमध्ये जोरदार टक्कर झाल्याने हा अपघात घडला. यामध्ये ७ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (Bihar Accident)
या घटनेबाबत वाहतूक डीएसपींनी माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, मिठापूरहून झेरोमाईलच्या दिशेने एक ऑटो जात होती, त्यात आठ जण प्रवासी प्रवास करत होते. दुसरीकडे मिठापूरजवळच मेट्रोचेही काम सुरू होते. ऑटोची येथील मेट्रो क्रेनला जोरदार धडक बसली. या अपघातात एक महिला आणि एका मुलासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला असल्याचे वाहतूक अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. (Bihar Accident)
हे ही वाचा: