J&K Avalanche: येत्या २४ तासांत जम्मू-काश्मीरमधील ‘या’ जिल्ह्यात हिमस्खलनाचा इशारा | पुढारी

J&K Avalanche: येत्या २४ तासांत जम्मू-काश्मीरमधील 'या' जिल्ह्यात हिमस्खलनाचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क: येत्या २४ तासांत जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा आणि गंदरबल जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये २५०० मीटरवर मध्यम धोक्याच्या हिमस्खलनाचा अंदाज आहे, अशी माहिती जम्मू आणि काश्मीर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक्स अकाऊंटवरून दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (J&K Avalanche)

जम्मू काश्मिरमधील या भागात राहणाऱ्या लोकांना खबरदारी घेण्याचा आणि हिमस्खलनाच्या प्रवण भागात जाण्याचे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हिमस्खलन या नैसर्गिक आपत्ती दरम्यान मदतीसाठी 112 डायल करा असे देखील J & K आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे. (J&K Avalanche)

भारतीय हवामानशास्त्र विभागाने शनिवार दि. १३ एप्रिलपासून दि.सोमवार१५ एप्रिल २०२४ पर्यंत जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये मुसळधार पाऊस (64.5-115.5 मिमी) होण्याची शक्यता आहे. १४ ते १५ एप्रिल दरम्यान हिमाचल प्रदेशमध्ये देखील हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (J&K Avalanche)

Back to top button