दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होणार; AAP चा मोठा दावा | पुढारी

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होणार; AAP चा मोठा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीत केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या तयारीत आहे, असा मोठा दावा दिल्लीच्या मंत्री आणि आप नेत्या आतिशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले.  त्या म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल सरकारविरोधात मोठे राजकीय षडयंत्र रचले जात आहे. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यांनी उपराज्यपालद्वारा गृह मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रांवरही आक्षेप घेतला. आतिशी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की, भाजपशासित केंद्र सरकार येत्या काही दिवसांत दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करणार असल्याची आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

‘सरकार पाडण्याचे रचले जात आहे षड्यंत्र’

जुनी केस हाती घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या खासगी सचिवाला बडतर्फ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल सरकार पाडण्याचे हे मोठे षड्यंत्र आहे. अरविंद केजरीवाल यांना भाजपशासित केंद्र आणि ईडीने खोट्या प्रकरणात अडकवून अटक केली आहे. भाजपचे लोक दिल्लीत निवडणूक जिंकू शकत नाहीत, म्हणून त्यांना निवडून आलेले अरविंद केजरीवाल सरकार पाडायचे आहे.

Back to top button