Arvind Kejriwal News : केजरीवालांचे स्वीय सहाय्यक विभवकुमार बडतर्फ | पुढारी

Arvind Kejriwal News : केजरीवालांचे स्वीय सहाय्यक विभवकुमार बडतर्फ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्यात मनी लॉन्ड्रीगच्या आरोपाखाली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू आहे. केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभवकुमार यांच्यावर आज (दि.११) दक्षता संचालनालयाने तडकाफडकी बडतर्फीची कारवाई केली.

विभवकुमार यांच्याविरोधात २००७ पासून प्रलंबित असलेल्या प्रकरणात दक्षता विभागाचे विशेष सचिव वाय. व्ही. व्ही. जे. राजशेखर यांनी बडतर्फीचा आदेश जारी केला. केंद्रीय नागरी सेवा कायदा १९६५ च्या कलम ५ अंतर्गत विभवकुमार यांना बडतर्फ करण्यात आल्याचे या आदेशात म्हटले आहे. ईडीने दोनच दिवसांपूर्वी विभवकुमार यांची चौकशी केली होती.

हेही वाचा :

Back to top button