मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी BRS नेत्‍या के कवितांना ‘सीबीआय’ने केले अटक

भारत राष्ट्र समितीच्‍या (BRS) नेत्‍या के कविता
भारत राष्ट्र समितीच्‍या (BRS) नेत्‍या के कविता
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तिहार तुरुंगात असलेल्या भारत राष्ट्र समितीच्‍या (BRS) नेत्‍या के कविता यांना दिल्ली दारू धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज ( दि. ११ एप्रिल) अटक केली. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्‍या असणार्‍या कविता यांना न्‍यायालयाने २३ एप्रिलपर्यंत न्‍यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्‍या त्‍या तिहार कारागृहात आहेत. सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) १५ मार्च रोजी हैदराबादमधील राहत्या घरातून त्‍यांना अटक केली होती.

नियमित जामीन अर्जावर २० एप्रिलला सुनावणी

दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात के.कविता सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आपल्या मुलाची परीक्षा असल्याच्या कारणावरून त्यांनी दिल्ली न्यायालयात अंतरिम जामीन मागितला होता. या अर्जाला ईडीने विरोध केला आहे. परंतु न्यायालयाने कोणताही निर्णय न देता, हा निर्णय राखून ठेवला आहे. दरम्यान त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी शनिवारी २० एप्रिल रोजी होणार आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

के. कविता यांच्यावर 'हे' आहेत आरोप?

के. कविता या तेलंगणातील विधान परिषदेच्या सदस्य आहेत. दिल्लीतील मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी अमित अरोरा याने चौकशीदरम्यान के. कविता यांचे नाव घेतले होते. त्यानंतर कविता ईडीच्या रडारवर आल्या. ईडीने आरोप केला आहे की 'साउथ ग्रुप' नावाच्या लिकर लॉबीनं आणखी एक आरोपी विजय नायर यांच्यामार्फत 'आप' नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्‍यमंत्री  मनीष सिसोदिया तुरुंगात आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news