Delhi Excise Policy Scam : के. कविता यांचा जमीन अर्ज फेटाळला

k kavita
k kavita

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Delhi Excise Policy Scam : दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सध्या तिहार तुरुंगात असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या (बीआरएस) के. कविता यांनी अंतरिम जामीन मिळण्यासाठी दाखल केलेली याचिका नवी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या असलेल्या के. कविता यांना मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने हैदराबाद येथील त्यांच्या बंजारा हिल्स निवासस्थानातून 15 मार्च रोजी अटक केली होती. नवी दिल्लीत मोठ्याप्रमाणात मद्य परवाने मिळण्यासाठी के. कविता या सदस्य असलेल्या 'साऊथ ग्रुप' या कपंनीने आम आदमी पक्षाला १०० कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे. या आरोपप्रकरणी न्यायालयाने कविता यांची गेल्या मंगळवारी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

मद्य धोरण घोटाळ्यातील भ्रष्टाचाराची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. के. कविता यांची तिहार तुरुंगात चौकशी करण्याची परवानगी द्यावी, अशी विंनती सीबीआयने न्यायालयाला केली आहे. कविता यांचे वकील नितेश राणा यांनी त्याला विरोध केला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून या प्रकरणाची सुनावणी 10 एप्रिल रोजी ठेवली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news