पुढारी ऑनलाईन डेस्क : जनसंघ पक्षाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जींनी जिना यांच्या मुस्लिम लीगसोबत करार केला होता. काँग्रेसने कधीच करार केला नव्हता. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंग यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानचे दिवंगत पंतप्रधान जिना यांनची प्रशंसा केली.कोणत्याही काँग्रेस नेत्याने तसे केले नाही, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी 'ANI'शी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
यावेळी जयराम रमेश म्हणाले की, "काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आठ कोटी घरांमध्ये जाणार आहे. शेतकरी न्याय, महिला न्याय, युवा न्याय, कामगार न्याय. आमचे कार्यकर्ते आणि नेते आठ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचत आहेत. आम्ही देशासमोरील खरे मुद्दे मांडले आहेत देशासमोर, महिला, शेतकरी, तरुण, कामगार, वंचित लोक, मागासवर्गीय लोक, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जाती, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत."
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे. जुनी काँग्रेस यामध्ये कोठेही दिसत नाही. यामध्ये डावे प्रबळ झाले आहेत. जे मतदारसंघ काँग्रेसचे बालेकिल्ला मानला जात होते त्या जागांवरही काँग्रेस उमेदवार उभे करण्याचे धाड करत नाही. काँग्रेस ज्या काँग्रेस ज्या व्यक्तीला तिकीट देत आहे तो दुसऱ्या दिवशी काँग्रेस सोडत आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील जाहीर सभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला होता.
आज काँग्रेस पक्षाकडे ना देशहिताची धोरणे आहेत ना देश उभारणीचा दृष्टीकोन आहे. आजच्या भारताच्या आशा आणि आकांक्षांपासून काँग्रेस पक्ष पूर्णपणे तुटलेला आहे. स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिम लीगमध्ये जी विचारसरणी प्रचलित होती तीच विचारसरणी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसून येते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काँग्रेस अजिबात दिसत नाही. अशी काँग्रेस भारताला २१व्या शतकात पुढे नेऊ शकत नाही, असा दावाही नरेंद्र मोदी यांनी केला.
हेही वाचा :