मध्यान्ह भोजनाच्या उकळत्या तांदळात पडून ८ वर्षांचा मुलगा जखमी, मुख्याध्यापकांविरुद्ध चौकशीचे आदेश | पुढारी

मध्यान्ह भोजनाच्या उकळत्या तांदळात पडून ८ वर्षांचा मुलगा जखमी, मुख्याध्यापकांविरुद्ध चौकशीचे आदेश

भुवनेश्वर ; पुढारी ऑनलाईन ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्‍ह्यातील एका शाळेत दु:खद घटना समोर आली आहे. इथे गुरूवारी मध्यान्ह भोजनासाठी भात शिजवला जात होता. या दरम्‍यान एक दुर्घटना घडली. यावेळी एक आठ वर्षांचा मुलगा मोठ्या भांड्यात उकळत असलेल्‍या तांदळात पडला. यामध्ये तो मुलगा गंभीर भाजला गेला आहे. त्‍याला तात्‍काळ रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्‍याची प्रकृती स्‍थिर असल्‍याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांविरूद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत.

या विषयी अधिक माहितीनुसार, ही घटना बहकांडिया गावांतील अनंत नारायण उच्च प्राथमिक विद्यालयात घडली. या ठिकाणी मध्यान्ह भोजणासाठी एका मोठ्या भांड्यात शिजत असलेल्‍या उकळत्‍या तांदळात मुलगा पडला. या मध्ये मुलाची पाठ भाजली आहे.

या प्रकरणी केंद्रपाडा पोलिस स्‍टेशनचे इंन्स्‍पेक्‍टर सरोज साहू यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्‍यान जिल्‍हा शिक्षण अधिकारी प्रदीप कुमार नाग यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच एक समिती गठित करण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा :

 

Back to top button