Lok Sabha Election 2024 : शक्तीप्रदर्शन करत वायनाडमधून राहुल गांधींचा अर्ज दाखल | पुढारी

Lok Sabha Election 2024 : शक्तीप्रदर्शन करत वायनाडमधून राहुल गांधींचा अर्ज दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : शक्तीप्रदर्शन करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (Lok Sabha Election 2024 ) राहुल गांधी वायनाडमधून दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढणार आहे. (Lok Sabha Election 2024 )

लोकसभा निवडणूक २०२४ साठी राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड येथे रोड शो सुरू केला आहे. यावेळी बहिण प्रियंका गांधी देखील उपस्थित होत्या. वायनाडमध्ये राहुल यांची टक्कर सीपीआयच्या एनी राजा यांच्याशी होईल. एनी राजा यांनी रोड शो नंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

२६ एप्रिलला वायनाडमध्ये मतदान

लोकसभा निवडणूक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात वायनाडमध्ये २६ एप्रिलला मतदान होणार आहे.

राहुल गांधींचा रोड शो सकाळी ११ वाजता सुरू झाला. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले. राहुल गांधी म्हणाले की, ”तुमचा खासदार होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी तुम्हाला मतदार म्हणून पाहत नाही. मी माझ्या बहिणीबद्दल जसा विचार करतो तसाच मी तुझ्याशी वागतो आणि विचार करतो. कारण माझी आई, बहीण, भाऊ आणि वडील वायनाडमध्ये प्रत्येक घरात राहतात.”

Back to top button