काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराचा होणार जीर्णोद्धार; मुस्लिम काळात झाली होती मोडतोड | Martand Sun temple in Anantnag

काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराचा होणार जीर्णोद्धार; मुस्लिम काळात झाली होती मोडतोड | Martand Sun temple in Anantnag

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू काश्मीर येथील आनंतनाग जिल्ह्यातील ८ व्या शतकातील मार्तंड सूर्यमंदिराचा जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्यात येणार आहे. हे मंदिर भारतातील सर्वांत जुने सूर्यमंदिर आहे. सम्राट ललीतादित्य मुक्तपाद यांनी हे मंदिर उभारले होते. त्यानंतर मध्य युगात मुस्लिम शासक सुलतान सिंकदर शहा मिर याच्या आदेशावरून हे मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले होते. (Martand Sun temple in Anantnag)

या मंदिराचे संरक्षण, संवर्धन आणि जीर्णोद्धार करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव आणि सांस्कृतिक विभागाचे अधिकारी यांच्यात आज मीटिंग होणार आहे, असे लाइव्ह मिंटच्या बातमीत म्हटले आहे.

"मुख्य सचिव आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही मीटिंग घ्यावी. यामध्ये या मंदिराचे संरक्षण, संवर्धन आणि जीर्णोद्धार यावर चर्चा व्हावी. तसेच सम्राट ललीतादित्य यांचा पुतळा मंदिर परिसरात उभारण्यावर चर्चा व्हावी," असे या बैठकी संदर्भातील पत्रात म्हटले आहे.

मार्तंड सूर्यमंदिर | Martand Sun temple in Anantnag

७ व्या शतकानंतर काश्मीरवर करकोटा राजघरण्याची सत्ता होती. या घरण्यातील शासक सम्राट ललीतादित्य यांनी ८ व्या शतकात काश्मीरमध्ये सूर्याचे भव्य मंदिर बांधले होते. हे वास्तू सध्या पुरातत्त्व खात्याने संरक्षित केली आहे. मध्य युगात सुलतान सिकंदर शाह मिर याने हे मंदिर उद्धवस्त केले. राजतरंगिणी या ऐतिहासिक काव्यग्रंथात करकोट या राजघरण्यासंदर्भात बरेच संदर्भ आहेत.
गेल्या महिन्यात जम्म कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या मंदिराला भेट दिली होती आणि येथे आयोजित यज्ञात सहभाग घेतला होता. त्यानंतर मंदिराच्या जीर्णोद्धारासंदर्भात विचार सुरू झाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news