पुढारी ऑनलाईन डेस्क : आमच्या सरकारने तिसऱ्या टर्मची तयारी सुरू केली आहे. आम्ही आगामी पाच वर्षांसाठी एक रोडमॅप बनवत आहोत. तिसर्या टर्ममध्ये पहिल्या १०० दिवसांमध्ये मोठे निर्णय घेतले जातील, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.३१ मार्च) दिली. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
या वेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या दहा वर्षांमध्ये तुम्ही विकासाचा फक्त ट्रेलरच पाहिला आहे. आता देशातला आणखी प्रगतीपथावर घेवून जायचे आहे. यंदाची लोकसभा निवडणूक ही केवळ सरकार स्थापन करण्यासाठीची निवडणूक नाही तर 2विकसित भारतासाठी आहे. 2024 लोकसभा निवडणुकीतील जनादेश भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनवेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
"आज भारतात आधुनिक पायाभूत सुविधा वेगाने निर्माण होत आहेत. आज भारत पायाभूत सुविधांच्या उभारणीत अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे. आज तरुणांसाठी प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी निर्माण होत आहेत. आज देशातील महिला शक्ती नवनवे संकल्प घेऊन पुढे येत आहे. आज भारताची विश्वासार्हता नवीन उंचीवर आहे, संपूर्ण जग भारताकडे आश्चर्याने पाहत आहे," असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
हेही वाचा :