INDIA alliance rally : देशात एका व्यक्तीचे, एका पक्षाचे सरकार धोकादायक : उद्धव ठाकरे | पुढारी

INDIA alliance rally : देशात एका व्यक्तीचे, एका पक्षाचे सरकार धोकादायक : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील एका व्यक्तीचे आणि एक पक्षाचे सरकार घालविण्याचे वेळ आली आहे. एका पक्षाचे सरकार देशासाठी घातक ठरू लागले आहे. देशाची तानाशाहीकडे वाटचाल सुरू झाली आहे, असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या वतीने आज (दि. ३१) महारॅली आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. INDIA alliance rally

माझा परिवार असे म्हणून काहीही होत नाही. तर कुटुंबाची जबाबदारीही घेण्याची गरज आहे. निवडणूक रोख्यांचे बिंग फुटल्यानेच अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आल्याची आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला. भाजप या रॅलीला गुंडांची रॅली म्हणत आहे. परंतु आम्ही निवडणूक प्रचारासाठी नाही, तर लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी एकत्र आलो आहोत. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ केले. भ्रष्टाचाऱ्यांनी भरलेला पक्ष सरकार कसे चालवू शकतो? असा सवाल ठाकरे यांनी केला. INDIA alliance rally

ज्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, ते सर्व भाजपसोबत आहेत. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचा वापर भाजप विरोधकांना संपविण्यासाठी केला जात आहे. भ्रष्टाचारी लोक देशाचा विकास करू शकत नाही, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर या सरकारने लाठीचार्ज केला. परंतु, आम्ही घाबरणारे नाही, तर लढणारे आहोत. आता आम्ही एकत्र आलो आहोत, कल्पना सोरेन, सुनिता केजरीवाल यांच्यासोबत संपूर्ण देश आहे, त्यांनी आता काळजी करू नये, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

हेही वाचा

Back to top button