Lok Sabha Election: तत्कालिन इंदिरा सरकारने कठोरपणे ‘कचाथीवू’ बेट श्रीलंकेला दिले; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल | पुढारी

Lok Sabha Election: तत्कालिन इंदिरा सरकारने कठोरपणे 'कचाथीवू' बेट श्रीलंकेला दिले; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी श्रीलंकेला धोरणात्मक कचाथीवू बेट देण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावरून टीका करत हल्लाबोल केला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने 1974 मध्ये श्रीलंकेला कचाथीवू बेट कसे सुपूर्द केले हे माहिती अधिकार (आरटीआय) अर्जानंतर समोर आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी समोर आलेली माहिती ही धक्कादायक आणि डोळे ऊघडणारी असल्याचे म्हटले आहे. (Lok Sabha Election)

भारताची एकता, अखंडता आणि हित कमकुवत करणारी काँग्रेस आहे. गेल्या ७५ वर्षात काँग्रेसने हिच पद्धत वापरत काम केल्याची टीका देखील पीएम मोदींनी केली आहे. यावरून प्रत्येक भारतीयाला राग आला असून त्यांच्या मनात याविरोधात पुन्हा एकदा चीड निर्माण झाली आहे. यामुळे आम्ही काँग्रेसवर कधीही विश्वास ठेवू शकत नाही असे पीएम मोदी यांनी स्पष्ट केले आहे. (Lok Sabha Election)

तामिळनाडूतील कचाथीवू बेटावरून राजकीय वर्तुळात खळबळ

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील कचाथीवू बेट श्रीलंकेला देण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरटीआयमधून मिळालेल्या उत्तरावरून असे दिसून आले आहे की, 1974 मध्ये तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने एका करारानुसार कचाथीवू बेट श्रीलंकेला दिले होते. अधिकृत दस्तऐवज आणि संसदीय नोंदी हे उघड करतात की, तत्कालीन भारत सरकारने पाल्क सामुद्रधुनीतील एका बेटावर एका लहान देशाच्या नियंत्रणासाठी लढाई हरली होती. तर दुसरीकडे, श्रीलंका (तेव्हाचे सिलोन) सरकारने हे बेट हिसकावण्याचे सर्व प्रयत्न केले होते. आरटीआयच्या माध्यमातून कचठेवू बेटाबाबतचा हा खुलासा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Lok Sabha Election)

Back to top button