Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरातून संजय मंडलिक फायनल! शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर | पुढारी

Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरातून संजय मंडलिक फायनल! शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. या मालिकेत महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गुरुवारी आलेल्या या यादीत 8 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यात कोल्हापुरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना तिकीट देण्यात आले आहे.

उमेदवार कोण आहेत?

मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे
कोल्हापूर : संजय मंडलिक
शिर्डी : सदाशिव लोखंडे
बुलढाणा : प्रतापराव जाधव
हिंगोली : हेमंत पाटील
रामटेक : राजू पारवे
हातकणंगले : धैर्यशील माने
मावळ : श्रीरंग आप्पा बारणे

खरे तर महाराष्ट्रात जागावाटपाबाबत महायुतीमध्ये जवळपास एकमत झाले आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजप 28 जागांवर एनडीएच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीत निवडणूक लढवणार आहे. याशिवाय शिवसेना (शिंदे गट) 14 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तसेच राष्ट्रवादीसाठी (अजित पवार गट) 5 जागा सोडल्या जातील. राष्ट्रीय समाज पक्षालाही एक जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अभिनेते गोविंदा अहुजा यांना शिंदे तिकीट देणार?

अभिनेते गोविंदा अहुजा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. गुरुवारी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आता ते आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा हे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शल्यता आहे. या जागेवरून उद्धव ठाकरे (शिवसेना गट) यांनी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे.

 

Back to top button