Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे ३७ स्टार प्रचारक जाहीर! अजित पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरेंसंह प्रमुख नेत्यांचा समावेश | पुढारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे ३७ स्टार प्रचारक जाहीर! अजित पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरेंसंह प्रमुख नेत्यांचा समावेश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) वतीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी ३७ स्टार प्रचारक यादी जाहीर करण्यात आली. यात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा समावेश आहे. दरम्यान, काल जाहीर झालेल्या भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत अजित पवारांच्या नावाचा समावेश होता. मात्र अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपच्या कुठल्याही नेत्याचे नाव नाही.

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवार निश्चितीसह सर्वच राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या याद्या तयार केल्या आहेत. काल भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) वतीनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये एकूण ३७ स्टार प्रचारक असून पक्षाध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह महाराष्ट्रातील मंत्री आणि प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) ३७ स्टार प्रचारकांमध्ये कोण?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) स्टार प्रचारकांमध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मंत्री धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री संजय बनसोडे, अदिती तटकरे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. के. शर्मा, सय्यद जलालूद्दीन, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी, आमदार सुनिल टिंगरे, इंद्रनील नाईक, सुनिल शेळके, विक्रम काळे, चेतन तुपे, नितीन पवार, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, दत्ता भारणे, आमदार सतीश चव्हाण, प्रवक्ते उमेश पाटील, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, माजी आमदार अमरसिंह पंडित, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी आदींचा समावेश आहे.

Back to top button