Lok Sabha Election 2024 : पंजाबमध्ये ‘आप’ला दुहेरी झटका! खासदार सुशील कुमार रिंकू, आमदार शीतल अंगुरल भाजपमध्ये दाखल | पुढारी

Lok Sabha Election 2024 : पंजाबमध्ये 'आप'ला दुहेरी झटका! खासदार सुशील कुमार रिंकू, आमदार शीतल अंगुरल भाजपमध्ये दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : lok sabha election 2024 : पंजाबमध्ये भाजपने आम आदमी पार्टीला दुहेरी झटका दिला आहे. आम आदमी पक्षाचे जालंधरचे खासदार सुशील कुमार रिंकू आणि एक आमदार शीतल अंगुरल यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे सदस्यत्व घेतले. या दोघांना भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि पंजाब पक्षाचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी पक्षाचे सदस्यत्व दिले. यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरीही उपस्थित होते. पुरी म्हणाले, ‘भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि कुटुंबाचा भाग बनत आहेत. आम्ही सुशील कुमार रिंकू आणि शीतल अंगुरल यांचे स्वागत करतो.’

सुशील कुमार रिंकू म्हणाले की, पंजाबमधील परिस्थिती आता बदलत आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठी आपण सर्व मिळून काम करू. जालंधर मतदारसंघातून आपने पुन्हा सुशील कुमार रिंकू यांना उमेदवारी दिली होती. ‘आप’च्या नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. 2023 च्या पोटनिवडणुकीत सुशील कुमार रिंकू यांनी जालंधरची जागा 58,691 मतांच्या मोठ्या फरकाने जिंकली होती.

रवनीत बिट्टू यांचाही भाजपमध्ये प्रवेश

तत्पूर्वी, मंगळवारी मंगळवारीच लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. बिट्टू हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू आहेत. बेअंत सिंग यांची 1995 मध्ये चंदीगड येथे कट्टरवाद्यांनी आत्मघातकी हल्ल्यात हत्या केली होती. रवनीतसिंग बिट्टू हे खलिस्तानच्या विरोधात बोलणारे नेते आहेत. त्यांच्या येण्याने भाजपची ताकद वाढल्याचे मानले जात आहे.

Back to top button