

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी हरियाणा मधील आठ उमेदवारांची यादी गुरुवारी रात्री उशिरा जाहीर केली. हरियाणामध्ये एकूण दहा लोकसभा क्षेत्र आहेत. त्यापैकी इंडिया आघाडीद्वारे काँग्रेस नऊ तर आम आदमी पक्ष एका जागेवर लढत आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या आघाडी विरुद्ध भाजपने यापूर्वीच आपले सर्व दहाही उमेदवार जाहीर केले आहेत. (Lok Sabha Election)
काँग्रेसने फरीदाबाद वगळता सर्व लोकसभा क्षेत्रांमधील उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे फरीदाबाद लोकसभा वगळता दोन्ही बाजूचे उमेदवार जाहीर झाल्याने कोणासमोर कोणाचे आव्हान असणार हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. (Lok Sabha Election)
काँग्रेसचा, विशेष करून हुड्डा परिवाराचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रोहतक मतदार संघातून काँग्रेसने राज्यसभेतील खासदार दिपेंदर सिंह हुड्डा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे अरविंद शर्मा त्यांच्यासमोर उभे आहेत. काँग्रेसचे दिव्यांशु बुद्धीराजा हे भाजप नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरुद्ध रिंगणात आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस आणि हिमाचल प्रदेशच्या माजी प्रभारी कुमारी सेलजा त्यांचे जुने सहकारी असलेले, काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेले अशोक तवर यांच्याविरुद्ध सिरसा मतदारसंघात आव्हान उभे करणार आहेत.
१) वरुण चौधरी – अंबाला
२) कुमारी सेलजा – सिरसा
३) जय प्रकाश – हिसार
४) दिव्यांशु बुद्धिराजा – कर्नाल
५) सतपाल ब्रम्हचारी – सोनिपत
६) दिपेंडर सिंह हुड्डा – रोहतक
७) राव दान सिंह – भिवानी महेंद्रगड
८) महेंद्र प्रताप – फरिदाबाद