देशात होऊ घातलेली अठरावी लोकसभा निवडणूक देशासह जगभरातील आजवरची सर्वात महागडी निवडणूक ठरण्याची शक्यता एका अंदाजानुसार आहे. आगामी निवडणुकीत 1.2 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्ची पडेल, असा अंदाज राजकीय खर्चावर लक्ष ठेवणार्या सेंटर फॉर मीडिया स्टडीज (सीएमएस) या संस्थेने वर्तविला आहे. अमेरिकेत 2020 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत सुमारे 1.2 लाख कोटी रुपये खर्च झाले होते. याहून अधिक रक्कम आगामी निवडणुकीत भारतात खर्ची पडण्याचा 'सीएमएस'चा अंदाज खरा ठरल्यास स्वाभाविकपणे ही जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरणार आहे.
60 हजार कोटी रुपये (जाहीर व अघोषित मिळून) 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खर्च झाले होते.
95 लाख रुपये खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला घालून दिली आहे.
20 दिवसांच्या प्रचारावर प्रत्यक्षात एका उमेदवाराचे सरासरी 5.75 कोटी रुपये खर्ची पडतील.
543 जागांवर प्रत्येक उमेदवाराचा खर्च काढल्यास तो प्रचार व जाहिरात खर्च वगळता 3,112 कोटी रुपये खर्च होईल.
220 कोटी रुपये खर्च यंदा लोकसभेच्या एका जागेवर होईल.
97 कोटी मतदार देशात आहेत.
1240 रुपये खर्च प्रतिमतदार होईल.