Lok Sabha Election 2024 : ‘लक्षद्वीप’साठी अजित पवार गटाकडून युसुफ टीपी यांची उमेदवारी जाहीर | पुढारी

Lok Sabha Election 2024 : 'लक्षद्वीप'साठी अजित पवार गटाकडून युसुफ टीपी यांची उमेदवारी जाहीर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने लक्षद्वीपच्या जागेवर युसुफ टीपी यांची उमेदवारी घोषित केली. महाराष्ट्र राज्याबाहेर लोकसभेची ही एकमेव जागा अजित पवार गट लढवत जात आहे. यापूर्वी 2019 च्या लोकसभेला राष्ट्रवादीच्या वतीने ही जागा मोहम्मद फैजल यांनी जिंकली होती. मात्र राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर फैजल यांनी शरद पवार गटात जाणे पसंत केले. या पार्श्वभुमीवर अजित पवार गटाने आपला उमेदवार या ठिकाणी दिला. त्यामुळे इथली लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अशी होण्याची दाट शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राज्याबाहेरही आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून अरुणाचल प्रदेशमधील विधानसभेच्या बहुतांश जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने लढवल्या जात आहेत. तसेच मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली लक्षद्वीपची जागाही अजित पवार लढवत आहे.

2019 मध्ये लक्षद्वीपची जागा मोहम्मद फैजल यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील वर्षी फुट पडली. यानंतर खासदार मोहम्मद फैजल शरद पवार गटासोबत राहिले. त्यामुळे अजित पवार गटाने या ठिकाणी आपला उमेदवार दिला आहे. अजित पवार गट महायुतीत असल्यामुळे स्वाभाविकच या ठिकाणी भाजपचा उमेदवार असणार नाही. शरद पवार गटाने अद्याप या ठिकाणी उमेदवारी घोषित केली नसली तरी पुन्हा एकदा मोहम्मद फैजल यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथली लढत ही अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशीच होणार आहे.

लक्षद्वीप लोकसभेसाठी युसुफ टीपी यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने घोषित करण्यात आली. अजित पवार गटाचे प्रवक्ते बृजमोहन श्रिवास्तव यांनी युसुफ टीपी यांच्या उमेदवारीबाबत माहिती दिली. दरम्यान, महाराष्ट्र राज्याबाहेर ही एकमेव जागा अजित पवार गटाच्या वतीने लढवली जात आहे.

Back to top button