बिहारच्या सुपौलमध्ये भीषण अपघात, कोसी नदीवरील पुलाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा मृत्यू, ९ जण जखमी | पुढारी

बिहारच्या सुपौलमध्ये भीषण अपघात, कोसी नदीवरील पुलाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा मृत्यू, ९ जण जखमी

पुढारी ऑनलाईन : बिहारमधील सुपौलमध्ये कोसी नदीवर पुलाच्या बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला असून, अनेक मजूर गाडले गेल्याची भीती व्यक्‍त करण्यात येत आहे.

सध्या मदतकार्य पथक घटनास्थळी पोहोचले असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या अपघातात ९ जण जखमी झाले आहेत.   दबलेल्‍या मजुरांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

बिहारमध्ये निर्माणाधीन पुलाला अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. जून 2023 मध्ये बिहारमधील भागलपूरमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला होता. खगरिया-अगुवानी-सुलतानगंज दरम्यान बांधण्यात येत असलेला पूल कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये काही वेळातच संपूर्ण पूल गंगा नदीत बुडाल्याचे समोर आले होते.

आश्चर्याची बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वीही या पुलाचा काही भाग कोसळला होता. सीएम नितीश कुमार यांनी 2014 मध्ये या पुलाची पायाभरणी केली होती. या पुलासाठी एकूण 1717 कोटी रुपये खर्च आला होता. एप्रिलमध्ये आलेल्या वादळामुळे या बांधकामाधीन पुलाचा काही भागही खराब झाला होता.

हेही वाचा : 

Back to top button