जाहिरात प्रकरणी बाबा रामदेव यांना समन्स मिळाल्यानंतर ‘पतंजलि’ने सुप्रीम कोर्टाकडे मागितली माफी | पुढारी

जाहिरात प्रकरणी बाबा रामदेव यांना समन्स मिळाल्यानंतर 'पतंजलि'ने सुप्रीम कोर्टाकडे मागितली माफी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलि आयुर्वेद आणि कंपनीचे एमडी आचार्य बालकृष्ण यांनी संभ्रमात टाकणाऱ्या जाहिराती प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडे विना शर्त माफी मागितली आहे. कंपनी आणि आचार्य बालकृष्ण म्हणाले की, पुन्हा ही चूक होणार नाही. कोर्टाने बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना २ एप्रिल रोजी वैयक्तिकरित्या हजर राहण्यास सांगितले आहे. काही दिवस आधी सुप्रीम कोर्टाने दोघांनाही अवमान नोटिस जारी केले होते आणि दोन आठवड्यानंतर कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. सुप्रीम कोर्टाने  आयएमएच्या एका याचिकेवर सुनावणीची ही ऑर्डर दिली होती. यामध्ये याचिकेत बाबा रामदेव यांच्यावर लसीकरण मोहीम आणि आधुनिक औषधांच्या विरोधात मोहीम चालवल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बाळकृष्ण यांनी सांगितले आहे की, त्यांना कायद्याचा आदर आहे. माफीनाम्यात ते म्हणाले की, ”कंपनी भविष्यात अशा जाहिराती जारी होणार नाहीत याची खात्री करेल”.

संबंधित बातम्या
Back to top button