Maternal Death | प्रसूती वेळी महिलेचा मृत्यू : स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणवणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरला ३० लाखाचा दंड | पुढारी

Maternal Death | प्रसूती वेळी महिलेचा मृत्यू : स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणवणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरला ३० लाखाचा दंड

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील ग्राहक मंचाने येथील होमिओपॅथी महिला डॉक्टर आणि नर्सिंग होमला ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात हा दंड करण्यात आला आहे. ही महिला डॉक्टर होमिओपॅथी डॉक्टर आहे. पण ती स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याचे भासवत होती, त्यामुळे उपचारातील निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन ग्राहक मंचाने हा दंड केला आहे. (Maternal Death)

या महिलेचा पती विनय कुमार मिश्रा यांनी ही तक्रार दाखल केली होती. तर दंड झालेल्या डॉक्टरचे नाव मीना पांडे असे आहे. १५ जानेवारी २०१४ला मिश्रा यांनी त्यांच्या पत्नीला प्रसूतीसाठी पांडे यांच्या नर्सिंग होममध्ये दाखल केले होते. या महिलेला मुलगी झाली. प्रसूती दरम्याने रक्तस्राव जास्त झालेला होता. त्यांनी डॉ. पांडे यांनी तातडीने रक्त उपलब्ध करण्याची सूचना मिश्रा यांनी दिली. मिश्रा रक्त घेऊन येईपर्यंत त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. (Maternal Death)

या प्रकारानंतर मिश्रा यांच्या लक्षात आले की डॉ. पांडे या होमिओपॅथी डॉक्टर आहेत, तरीही त्यांनी त्यांच्या पत्नीला अॅलोपॅथी उपचार दिले होते. त्यानंतर मिश्रा यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली. तसेच मेडिकल काऊन्सिलकडे या प्रकरणाचा पाठपुरावा केला.
डॉ. मीना पांडे यांनी त्यांचा नवर MBBS डॉक्टर असून ते नर्सिंग होम चालवतात आणि संबंधित महिलेवर त्यांनीच उपचार केले होते, असा बचाव ग्राहक मंचाकडे मांडला.

ग्राहक मंचाचे अध्यक्ष राजेंद्र सिंग आणि सदस्य विकास सक्सेना यांनी या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणाचा ठपका डॉ. मीना पांडे यांच्यावर ठेवला. “डॉ. पांडे या नोंदणीकृत स्त्रीरोगतज्ज्ञ नाहीत. त्यांनी स्वतःला स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून भासवले नसते तर मिश्रा त्यांच्या पत्नीला घेऊन त्यांच्या रुग्णालयात आलेच नसते,” असे सिंग यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button