Sita Soren joins BJP: झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या ‘भावजय’ सीता सोरेन यांनी हाती घेतले ‘कमळ’ | पुढारी

Sita Soren joins BJP: झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या 'भावजय' सीता सोरेन यांनी हाती घेतले 'कमळ'

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान झारखंडमधील सत्ताधारी पक्षाच्या आमदार सीता सोरेमन यांनी सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी झारखंडमध्ये भाजपचा हात धरत, कमळ हाती घेतले आहे. या झारखंड मुक्ती मोर्चाला मोठा धक्का मानला जात आहे. (Sita Soren joins BJP)

झारखंडमधील जामा मतदारसंघातील आमदार आणि झारखंडचे माजी मुख्‍यमंत्री हेमंत सोरेन यांचे मोठे बंधू दुर्गा सोरेन यांच्‍या पत्‍नी अशी  सीता सोरेन यांची राजकीय ओळख आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत आज (दि.१९) दिल्लीतील पक्ष कार्यालयात सीता सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Sita Soren joins BJP)

सीता सोरेन यांचा राजकीय प्रवास

ओडिशातील मयूरभंज येथे जन्मलेल्या सीता सोरेनने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्‍यांना वाचनाची आवड आहे. मुन्शी प्रेमचंद्र यांना साहित्य क्षेत्रातील आपला आदर्श मानतात. सीता सोरेन यांनी राज्यातील बेकायदेशीर खाणकाम आणि वाहतुकीच्या मुद्द्यावर अनेकदा आवाज उठवला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये सीता सोरेन यांच्‍या दोन मुली राजश्री सोरेन आणि जयश्री सोरेन यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने पक्ष स्थापन केला. त्याचे नाव होते दुर्गा सोरेन सेना. राज्यातील भ्रष्टाचार, विस्थापन, जमीन लुटणे आणि इतर समस्यांविरुद्ध लढा देणे हा यामागचा उद्देश असल्याचे दोन्ही मुलींनी सांगितले होते. त्यांची मुलगी राजश्रीने बिझनेस मॅनेजमेंटचे तर जयश्रीने कायद्याचे शिक्षण घेतले आहे.

Back to top button